शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक महत्त्वाची बाब: संजय किर्लोस्कर, इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ प्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 20:27 IST

कोल्हापूर : उद्योग क्षेत्रात गुंतवणूक ही महत्त्वाची बाब आहे. पुण्या-मुंबईनंतर गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूरला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्योग जगताला बहर येईल.

ठळक मुद्दे नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात दुसºया क्रमांकावरकोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी परिसरांत नवनवीन उद्योग

कोल्हापूर : उद्योग क्षेत्रात गुंतवणूक ही महत्त्वाची बाब आहे. पुण्या-मुंबईनंतर गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूरला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्योग जगताला बहर येईल, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे चेअरमन संजय किर्लोस्कर यांनी शनिवारी केले.

कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना येथे ‘सीआयआय’तर्फे आयोजित केलेल्या ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ या चारदिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.किर्लोस्कर म्हणाले, सांगली येथील किर्लोस्करवाडी येथे आमच्या पूर्वजांनी छोटासा उद्योग सुरू केला होता. तो वाढीला लागला. त्याची दखल कोल्हापूरच्या राजांनी घेतली होती. त्यातून कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राला त्यांनी चालना दिली होती. त्यामुळे आज ही उद्योगनगरी बहरत आहे.

आता त्यात आम्हीही गुंतवणूक केली आहे. आमच्या उद्योगांनाही बळ आले आहे. आमचा उद्धार जसा झाला आहे तसाच तुमचाही होईल. कोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी परिसरांत नवनवीन उद्योग आहेत; पण ते वाढण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. तरी उद्योजकांनी अधिक गुंतवणूक करावी.

खासदार महाडिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी शिक्षण, उद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्याच संस्कारांमुळे आज कोल्हापूरच्या उद्योग जगताचे नाव देशासह परदेशात झाले आहे. उत्तम हवा, मुबलक पाणी, सुपीक जमीन या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात दुसºया क्रमांकावर आहे. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय केवळ कर्तबागारीच्या जोरावर येथील उद्योजक ांनी उद्योग जगत वाढविले आहे. कुशल तंत्रज्ञ, दर्जात्मक उत्पादन यांचा विचार करता कोल्हापुरात संरक्षण विभागाचा एक प्रकल्प उभा राहिल्यास त्याला लागणारे साहित्य येथील उद्योजक देतील. येत्या हिवाळी अधिवेशनात यासाठी मागणी करू. त्याकरिता उद्योजकांनी अशा प्रकल्पाचा सादरीकरण आराखडा तयार करावा. तो देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व राज्यमंत्री सुभाष भांबरे यांना सादर करू. प्रास्ताविकात सीआयआय साउथ महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी प्रदर्शन आयोजनचा हेतू विशद केला. ‘सीआयआय’चे साउथ महाराष्ट्र झोनलचे माजी अध्यक्ष मोहन घाटगे यांनी आभार मानले.

‘सीआयआय’चे महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष ऋषिकुमार बागला, ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा, ‘आयआयएफ’चे दीपंकर विश्वास, ‘मॅक’चे हरिश्चंद्र धोतरे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सुरजितसिंग पवार, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, सौगत मुखर्जी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, पंचतारांकित एमआयडीसीचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ‘एमएसएमईडीआय’चे राजीव गुप्ते, अभय दफ्तरदार, फौंड्री इक्विपमेंटचे रवींद्र चिरपुटकर, उद्यम को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत मुळे, ‘सीआयआय’चे वेस्टर्न रिजनचे मॅनेजर शौगट मुखर्जी, आदी उपस्थित होते.आज, रविवारी सकाळी दहा ते बारा यादरम्यान ‘ग्रोथ आॅपॉर्च्युनिटीज इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅँड टुरिझम सेक्टर’ व दुपारी २.३० ते ४ या दरम्यान ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल चेंजिंग द डायनॅमिक आॅपॉर्च्युनिटीज अ‍ॅँड वे फॉरवर्ड’ या, तर सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत ‘इंडियन वुमेन नेटवर्क’ या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.